MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी20 May 2026

११ वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील नराधमाचा जामीन अर्ज धुळे न्यायालयाने फेटाळला

सांज दे.२ बन न्यूज

Photo 1 of 1

धुळे - येथील विशेष न्यायालयाने एका ११ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.

पीडित बालिका शिकवणीला जात असताना आरोपीने तिला जबरदस्तीने गाडीत बसवून निर्जनस्थळी नेले. तेथे अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

पीडितेच्या वडिलांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी वकील जी. वाय. पाटील आणि अँड. मयूर बैसाणे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे