MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर

अतिरिक्त सरकारी वकील अँड. निलेश कलाल व अँड. मयूर बैसाणे यांचा प्रभावी युक्तिवाद

Photo 1 of 1

धुळे (दै. पोलिस शोध) - मारुतीच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज पुन्हा एकदा न्यायालयाने नामंजूर केला आहे.

दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ८५, ३५२, ३५१ व ३ (५) अन्वये विवाहितेस मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती हेमंत राजेंद्र खैरनार, सासरे राजेंद्र खैरनार व सासू- सासऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती.

मयत विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध होते व त्यातूनच विवाहितेला मानसिक त्रास दिला जात होता. दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मयत दर्शन हेमंत खैरनार हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सदर आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आरोपी पती हेमंत खैरनार याने दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश कलाल व मूळ फिर्यादीतर्फे अँड. मयूर बैसाणे यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे