विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त; पती, सासू-सासऱ्यांचा जामीन नामंजूर
देवपुरातील घटना : सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणी

धुळे | प्रतिनिधी
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू-सासऱ्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. ॲड. मयूर मेघराज बैसाणे व सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला.
दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ८५, ३५२, ३५१ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हेमंत राजेंद्र खैरनार, सासरे राजेंद्र खैरनार व सासू- सासऱ्यांविरुद्ध फिर्याद देण्यात आली होती.
सदर विवाहितेचा मृतदेह वानखेडकर नगर येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला होता. मयत विवाहितेचा पती हेमंत खैरनार याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. त्याचबरोबर सासू-सासऱ्यांकडूनही मानसिक व शारीरिक छळ होत होता.
सदर जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अजय सानप तसेच फिर्यादी पक्षातर्फे ॲड. मयूर बैसाणे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला.
प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.
तत्सम प्रकरणे

विवाहितेचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पती, सासू व सासऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीचा जामीन पुन्हा नामंजूर
22 Mar 2025

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर
22 Mar 2025