MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी11 Feb 2026

कायदेशीर निकषांच्या आधारावर वकिलांचा 'स्वीकृत'साठी प्रस्ताव

महापालिका स्वीकृत सदस्य निवडीत वकिलांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : महानगरपालिकेच्या "स्वीकृत नगरसेवक" पदासाठी कायदेशीर निकषांचा आधार घेत अँड. मयूर बैसाणे यांनी मंगळवारी आपला नामनिर्देशन प्रस्ताव सादर केला आहे. वकील बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रस्ताव दाखल केला.

यामुळे धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत नवीन वळण निर्माण झाले आहे. यावेळी बुद्धिजीवी घटकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वकिलांनी केला.

मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अँड. संजय सोनवणे, अँड. मुकुंदराज वाघ आणि वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच अभ्यासपूर्ण युक्तिवाद करण्यात येत असल्याचेही दिसले.

महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ (२) नुसार, महानगरपालिकेतील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. ही निवडणूक नसून नामनिर्देशन असते.

महापालिकेतील विद्यमान राजकीय पक्षांच्या संख्येनुसार सदस्यांची निवड केली जाते. पक्षाकडून आलेल्या प्रस्तावानुसार निवडी होतात. मात्र काही वेळा कायदेशीर आणि सामाजिक निकषांना प्राधान्य दिले जात नसल्याची टीका केली जाते.

याचिका दाखल करणार - बैसाणे

मनपा स्वीकृत नगरसेवक पद हे आराजकीय बुद्धिजीवी घटकांसाठी राखीव आहे, मात्र त्यांना संधी मिळत नसल्याने आपण यासंदर्भात याचिका दाखल केली असल्याचे अँड. बैसाणे यांनी सांगितले.

तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत नियुक्त्या थांबवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही अँड. बैसाणे यांनी दिला आहे.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे