MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी

राजकीय उमेदवारांऐवजी तज्ञ सदस्यच 'स्वीकृत' करा आयुक्तांनी विशेष अधिकार वापरावा - अँड. मयूर बैसाणे

धुळे (दै. पोलिस शोध)

Photo 1 of 6
1 / 6

महापालिका निवडणुकांमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय पक्षांची सोय करू नये, स्वीकृत नगरसेवक हे पद तज्ञ व्यक्तींनाच द्यावे. वैद्यकीय, शिक्षण, विधी आणि विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना मनपात स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केले जावे. अशा तज्ञ व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी संख्याबळ नसेल तर आयुक्तांनी आपला विशेष अधिकार वापरून त्या व्यक्तींना शहर विकासासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी अँड. मयूर बैसाणे यांनी केली आहे.

त्यांनी काल मनपाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती माळीगांव यांना निवेदनही दिले. माध्यमांशी संवाद साधताना अँड. बैसाणे यांनी सांगितले की, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी इंजिनिअर, प्राध्यापक, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील उमेदवार येतात, जेणेकरून महापालिकेच्या विकासाला गती येईल. धुळे शहराची प्रगती होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

तसेच जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले होते. जर स्वीकृत नगरसेवक पदासाठी एखाद्या उमेदवाराकडे संख्याबळ नसेल तर आयुक्त त्यांच्या विशेष अधिकाराने अशा पूर्ण पात्र उमेदवारांची नियुक्ती करू शकतात.

महापालिकेच्या कारभारात या ज्ञानी लोकांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. वकील विभागातून मी स्वीकृत नगरसेवक पदासाठी काल नामनिर्देशन दाखल केले. यासाठी विधी व न्याय विभागाचे मला सहकार्य असून धुळे जिल्हा वकील संघाने मला पाठिंबा दिला आहे.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा या वकील संघटनेचे देखील मला पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला आहे. बुद्धिजीवी लोकांना जेव्हढे स्वीकृत सदस्य म्हणून स्थान दिले नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करेन, असा इशाराही अँड. बैसाणे यांनी दिला.

निवेदन देतेवेळी अँड. बैसाणे यांच्यासोबत अँड. मधुकर भिसे, अँड. ऋतुराज वाघ आणि वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे